Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात माजी नगरसेवकाच्या घरावर दगडफेक; कुटुंबात दहशत

 

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वाघनगर परिसरातील रहिवासी व माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या घरावर आज एका मनोरुग्ण व्यक्तीने जोरदार दगडफेक केल्याची घटना घडली. यात एका बकरीच्या पिल्लाचा मृत्यू झाला असून तालुका पोलिसांनी संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी संतोष पाटील यांच्यावर दोन जणांनी गोळीबार करीत प्राणघातक हल्ला केला होता, तेव्हा ते थोडक्यात बचावले होते. आजच्या हल्ल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

अधिक माहिती अशी की, आज सकाळी शिवाजी जमदाडे नावाच्या व्यक्तीने पाटील यांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. त्यात घराचे बरेच नुकसान झाली आहे. त्याच वेळी त्याने बाहेर असलेल्या एका बकरीच्या पिल्लालाही मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. दगडफेक झाल्यावर घरातील महिला बाहेर आल्या असता त्यांच्यासोबत असलेल्या एका बालकासही त्याने मारहाण केली. हा व्यक्ती मनोरुग्ण असण्याच शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान सुमारे दोन महिन्यांपूर्वी संतोष पाटील त्यांच्या शेतात जात असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात ते थोडक्यात बचावले होते. आजचा प्रकार त्या घटनेशी संबंधित तर नसावा, असी चर्चा परिसरात आहे. तालुका पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून ते पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version