Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगावात दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जळगावत दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत पाचोरा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या वर्षाच्या जून महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिला कार्यक्रम जळगाव आतील पिंप्राळा परिसरात होत आहे. येथे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाची भूमिपूजन हे उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

यानंतर ते पाचोरा येथील सभेला संबोधित करणार आहेत. तर याचप्रसंगी उध्दव ठाकरे यांच्याहस्ते माजी आमदार स्वर्गवासी आर.ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील करण्यात येणार आहे. दरम्यान या आजच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे यांचे दुपारी वाजेच्या सुमारास आगमन झाले. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. यानंतर ते पिंप्राळा येथे रवाना झाल्याचे वृत्त आहे

Exit mobile version