Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आसामचे माजी मुख्यमंत्री गोगई यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली

जळगाव प्रतिनिधी । आज आसाम राज्याचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगई यांना जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष खा. डॉ. उल्हास पाटील व एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी शोक संदेशाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. असे प्रतिपादन खा. डॉ. उल्हास पाटील यांनी केले आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन झालं आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. त्यानंतर गोगोई यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तरुण गोगोई यांनी आसाममध्ये सलग तीन टर्म मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. काँग्रेसमध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य पातळीवर महत्वाच्या पदांवर काम केले होते. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांना यश आले नाही.

त्यांच्या निधनाने एक अनुभवी, संयमी, लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपले आहे. असे देवेंद्र मराठे म्हणाले आहेत. आसामचे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी राज्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले.  गोगोई हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन दहावीत असतानाच राजकारणाकडे आकर्षित झाले. महाविद्यालयात असताना ते भारत युवक समाजाच्या आसाम विभागाचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९७१ मध्ये जोरहाट मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले आणि पुढे सहावेळा ते खासदार म्हणून निवडून गेले. 

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री, आसामचे तीन वेळा मुख्यमंत्री अशी त्यांची यशस्वी कारकिर्द राहिली आहे. ते कुशल प्रशासक होते. त्यांच्या निधनाने आसामची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून देशाच्य़ा राजकारणात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जळगाव जिल्हा एन एस यू आय व काँग्रेस कमिटी गोगोई कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.

 

 

 

 

Exit mobile version