भारत जोडो यात्रेच्या आढाव्यासाठी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह शेगावात

शेगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दोन दिवसांनी बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत आहे. याच दरम्यान शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभेचे देखील आयोजन करणात आले आहे. यासर्वांचा आढावा घेण्यासाठी आज मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  दिग्विजय सिंह शेगावात दाखल झाले आहेत.

 

काँग्रेसचे भारत जोडो यात्रा आता दोन दिवसांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये दाखल होणार आहे. या दरम्यान,  खा. राहुल गांधी यांची भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जाहीर सभा मोठी व्हावी याकरता काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. याच सभास्थळी आज मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी आढावा घेतला व काही सूचना केल्या.  एकंदरीत आता विदर्भातील या संतनगरी शेगावच्या सभेला भव्य दिव्य स्वरूप देण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने कोणतीच कसर ठेवल्या जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तब्बल २२ एकरच्या परिसरामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता राहुल गांधी यांची यात्रा या सभास्थळी पोहोचण्याचे आयोजकांच्या वतीने सांगितलं आहे. यावेळेस संतनगरीत आगमन झाल्यानंतर दिग्विजय सिंग यांनी संत श्री गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊ समाधीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्ह्याच्या संपर्क मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आ. राजेश एकडे, आ. बळवंत वानखेडे, डॉ. जयश्रीताई थोरात, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, रामविजय बुरुंगले, जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण आदींनी दिग्विजयसिंह यांचे स्वागत केले. यावेळी सभेच्या नियोजनासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिग्विजयसिंह यांनी दिल्या. इथल्या सभेला पाच लाखांहून अधिक लोकांची उपस्थिती राहण्याचा अंदाज आयोजकांकडून व्यक्त होत आहे. यात्रेच्या भव्य स्वागतासाठी शेगांव नगरीत जय्यत तयारी झाली आहे. स्वागत कमानी, होर्डिंग्ज, बॅनर्सनी सभेचा मोठा माहौल तयार झाला आहे.

 

Protected Content