Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सलग दुसऱ्यांदा भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद

hoki

 

मुंबई वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने शुक्रवारी २०२३च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारताची निवड केली आहे. भारताला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे.

पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आता भारतात १३ ते २९ जानेवारी रोजी होईल, असे एफआयएचने कळवले आहे. त्याचबरोबर एफआयएचच्या कार्यकारी मंडळाच्या गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत स्पेन आणि नेदरलँड्सला २०२२च्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले होते. भारतातील स्पर्धेचे ठिकाण अद्याप ठरले नसले तरी ओडिशातील भुवनेश्वर हे आता हॉकीचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे भुवनेश्वरमधील कलिंगा येथेच विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात येईल, अशी चर्चा आहे. विश्वचषक हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. याआधी भारताने १९८२ (मुंबई), २०१० (नवी दिल्ली) आणि २०१८ (भुवनेश्वर) साली विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित केली होती. नेदरलँड्सने तीन वेळा विश्वचषक स्पर्धा भरवली आहे.

Exit mobile version