Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डबल फेज वीज पुरवठ्यासाठी ग्रामस्थ धडकले बोदवड तहसील कार्यालयावर

WhatsApp Image 2019 06 28 at 7.59.55 PM

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील जलचक्र, वराळ, वाकी, शिंदी, मुक्तळ या गावात गेल्या २ ते ३ महिन्यापासून डबल फेज वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने या गावामध्ये रात्री अंधाराचे साम्राज्य असून वीज पुरवठा अभावी पिण्याच्या पाण्याची ही समस्या गंभीर झाल्याने येथील ग्रामस्थांनी बोदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनास याबाबत निवेदन दिले आहे.

बोदवड तालुक्यामधील जलचक्र, वराळ, वाकी, मुक्तळ, शिंदी या गावांमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून डबल फेज वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. डबल फेज विद्युत पुरवठा अभावी येथील गावांमध्ये रात्री अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतामध्ये वीज पुरवठा होत नसल्याने येथील शेतकरी ही त्रस्त झाले आहे . वारंवार महावितरणकडे तक्रार देऊनही डबल फेस वीज पुरवठा न जोडल्याने येथील संतप्त ग्रामस्थांनी बोदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले आहे. या गावांचा डबल फेज वीज पुरवठा त्वरित न जोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे

Exit mobile version