Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्वांचे भाग्य चांगले म्हणून जनार्दन महाराज गुरू मिळाले : शास्त्री धर्मप्रकाशदासजी (व्हिडीओ)

6d56e037 39c7 4c7d ad06 19ee872b1021

फैजपूर(प्रतिनिधी) महामंडलेश्‍वर जनार्दन महाराजांमुळे अनेकांना सत्संगाची व धर्माची ओढ लागली आपले शरीर चांगले असेल तर आपल्याला धर्माचे पालन करता येते हे तुम्हा सर्वांचे भाग्य आहे की, महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज हे गुरू म्हणून मिळाले असल्याचे स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांनी दिलेल्या आशिर्वचनात सांगितले. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा बुधवारी 42 वा अवतरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांची सकाळपासून आशीर्वाद घेण्यासाठी सतपंथ मंदिरात रीघ लागली होती.

शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांनी आशीर्वाचनात सांगितले की महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सतपंथ धर्माचा प्रसार हा परिसरा पुरता नव्हे तर विदेशातही ह्या धर्माचा प्रचार महाराजांनी सुरु ठेवला आहे इतर धर्मातील इतर संप्रदायातील संतांना सोबत घेऊन चालणारे जनार्दन महाराज आहेत. आणि संप्रदयांना सोबत घेऊन चालणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे महामंडलेश्वर जनार्दन महाराज असल्याचे शास्त्री धर्मप्रकाशदासजी यांनी सांगितले.

यावेळी मानभव पंताचे शास्त्री मानेकर बाबा स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्तीकिशोर दाजी, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शास्त्री भक्तीस्वरूपदाजी, शास्त्री नित्यस्वरूपदासजी, दत्त ठिबकचे संचालक जितेंद्र पवार यासह भाविक भक्तगण उपस्थित होते. सकाळी आ हरिभाऊ जावळे, माजी आ शिरीष चौधरी, एपीआय प्रकाश वानखडे, प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, तापी परिसर विद्या मंडळ चेअरमन लीलाधर चौधरी, भाजप गटनेते मिलिंद वाघूळदे, रविंद्र होते, निलेश राणे, डॉ कुंदन फेंगडे यासह असंख्य भाविकांनी आशिर्वाद घेतले.

 

कविता पवार यांचे ‘ऋतू पालकत्वाचे’पुस्तकाचे प्रकाशन

 

महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या अवतरणदिनी ‘ऋतू पालकत्वाचे’ पुस्तकाचे प्रकाशन संतमतांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दत्त ठिबक च्या संचालिका तथा सुप्रसिद्ध लेखिका कविता जितेंद्र पवार यांनी या आधी शोध नवीन सूर्याचा, आधार वड, दोन पाऊल पुढे आणि ऋतू पालकत्वाचे हे पुस्तक त्यांनी लिहले आहे. कोणताही आर्थिक स्वार्थ न बघता पुस्तक विक्रीतून आलेली रक्कम ही संतपंथ मंदिराला दिली जाते. ‘ऋतू पालकत्वाचे’ या पुस्तकाविषयी कविता पवार यांनी सांगितले की पाल्य आणि पालक यांच्या मध्ये कशा पद्धतीने समन्वय असला पाहिजे हे या ऋतू पालकत्वाचे या पुस्तकात दिले आहे.

 

Exit mobile version