Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना घरावर दगडफेक करून कुटुंबाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा रोडवरील गजानन नगरात राहणाऱ्या कुटुंबाच्या घरावर दगडफेक करत कुटुंबातील तीन जणांना मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, अशोक किसन ठोसर (वय-५७) रा. गजानन नगर, कानळदा रोड, जळगाव हे दोन मुलांसह वास्तव्याला आहे. फुटवेअरचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता अशोक ठोसर हे जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर पाणी पिण्यासाठी आले.

त्यावेळी त्यांच्या घराच्या मागे राहणारे अजय इंगळे, विजय इंगळे, रूपाली इंगळे आणि सरूबाई इंगळे हे काहीही कारण नसतांना अशोक ठोसर यांच्या घरासमोर येवून मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ करू लागले. त्यानंतर चौघांनी अशोक ठोसर यांच्यासह मुलगा किरण आणि मुलगी आश्विनी यांना मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.

यात किरण याला लाकडी दांडाने मारहाण केली तर अश्वीनीच्या डोक्यात कुंडी मारून फेकली. तर काही अनोळखी १० ते १२ जणांनी त्यांच्या घरावर दगडफेक करून सामानांचे नुकसान केले. याप्रकरणी अशोक ठोसर यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजय इंगळे, विजय इंगळे, रूपाली इंगळे आणि सरूबाई इंगळे सर्व रा. गजानन नगर, कानळदा रोड, जळगाव आणि यांच्यासह अनोळखी १० ते १२ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version