Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा समाजासाठी बहुउद्देशीय सभागृहासाठी आ. चंद्रकांत पाटील यांना निवेदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजासाठी बहुउद्देशीस सभागृह मिळावे या मागणीचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांना मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यात व शहरात मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असूनही अद्याप पावेतो समाजाची हक्काची वास्तू नसल्याने समाजातील गोरगरीब कुटुंबातील विवाह सोहळे तसेच सामाजिक उपक्रम सामूहिक विवाह सोहळे असतील किंवा MPSC व UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन असेल किंवा धार्मिक सोहळे असतील यासाठी अनेक वेळा इतर ठिकाणचे सभागृह किंवा मंगल कार्यालय यावर विसंबून राहावे लागत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रत्येक समाजासाठी असलेला जिव्हाळा व काम करण्याची मानसिकता पाहता मराठा समाजातील बहुसंख्य समाज बांधवांनी एकत्रित येत मुक्ताईनगर शहरात तालुक्यांतील समाज बांधवांसाठी उपयुक्त होईल असे मल्टी पर्पज सभागृह मिळावे अशा मागणीचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले.

 

याप्रंसगी मराठा समाजाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, सचिव यु. डी. पाटील, एस.बी. देशमुख, के. डी. पाटील, संदीप बागुल, नवनीत पाटील, डॉ एन.जी. मराठे, नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे, नगरसेवक डॉ प्रदीप पाटील, डॉ. योगेश पाटील, ॲड. नीरज पाटील, नारायण सीताराम पाटील, दिनकर किसन पाटील, भावराव महाराज पाटील, किशोर गावंडे, सुभाष बनिये, राजेंद्र बंगाळे, विनोद पाटील, ब्रिजलाल मराठे, सुनील उदे, प्रज्वल गावंडे, नरेंद्र पाटील, रमेश ढोले, नारायण पाटील, राजेंद्र पाटील, रमेश मराठे, प्रफुल्ल पाटील, दिलीप चोपडे, अरुण पाटील उचंदे, श्रीकृष्ण सोपान पाटील, जितेंद्र मुरहे, कृषा सुभाष पाटील , संदीप विटकरे, सोपान तायडे, ललित बाविस्कर , भास्कर पाटील, गणेश विश्वनाथ पाटील , नामदेव काटे, माधवराव पाटील , श्रीकृष्ण फुंडकर, साहेबराव नारायण पाटील, सोपान मराठे, रोहन पाटील , रविंद्र साहेबराव पाटील ,मितेश पाटील , उमेश पाटील , संचालक वाघ किरण महाजन , ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील,तानाजी पाटील आदींसह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version