हिवरा नदीकाठच्या रहिवाशांना पुराचा धोका; संरक्षण भिंत बांधण्याची मागणी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील कृष्णापुरीजवळील हिवरा नदीला पावसाळ्यात पूर येत असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात असते. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता नदीकाठी संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

पाचोरा शहरातील कृष्णापुरी लगत हिवरा नदीचे पात्र आहे. या नदीला लागुनच ५० ते ६० घरे असुन पावसाळ्यात नदीला पुर आल्याने त्यांच्या जिवीताला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. या आधी ही नदीला आलेल्या पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. या नदीच्या दोन्ही बाजुला संरक्षण भिंत बांधण्यात यावी. जेणेकरून येथील नागरिकांचे येणाऱ्या पुरा पासुन संरक्षण होवु शकते. या मागणीचे निवेदन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांना स्थानिक नागरिकांनी दिले.

सद्यस्थितीत याठिकाणी नदीवर पुल बांधण्याचे काम सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच संरक्षण भिंत बांधण्यात येईल. तुर्तास याठिकाणी पर्याय म्हणुन उपाय योजना तात्काळ करण्यात येईल. असे आश्वासन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी यावेळी निवेदनकर्त्यांना दिले आहे.

निवेदनावर प्रथमेश पाटील, फारुक खाटीक, नितीन पाटील, नगराज मिस्तरी, प्रशांत धनगर, लालचंद धनगर, रामलाल धनगर, ईश्वर भावसार, मयुर महाजन यांच्या सह्या आहेत.

 

Protected Content