Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फ्लोअर बॉल स्पर्धेत ओरियनच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व

kce news 1

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सतरा वर्षीय वयोगटातील विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली आहे.

14 डिसेंबर 2019 रोजी सतरा वर्ष वयोगातील विभागीय फ्लोअर बॉलच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत एकूण पाच संघ होते. या मधून ओरियनचा संघ विजयी होऊन त्यांची राज्यस्तराला निवड झाली. सदर स्पर्धा 18, 19, 20 डिसेंबर 2019 या रोजी नंदुरबार याठिकाणी होणार आहेत. याच स्पर्धांसाठी ओरिऑन संघ आज सकाळी रवाना झाला. विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जी. बेंडाळे, शाळेचे प्राचार्य संदीप साठे व शिक्षक शिक्षकेतर कर्मच्याऱ्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले. व राज्यस्तरासाठी शुभेच्छा दिल्या. संघ विजयी होण्यासाठी राजेंद्र बढे, आकाश सराफ, मयुर पाटील यांनी परीश्रम घेतले व मार्गदर्शन केले.

Exit mobile version