Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलढाणा येथे चिमुकल्यांचा झेंडावंदन

बुलडाणा प्रतिनिधी । गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. आज ७३ वा प्रजासत्ताक दिन असून शाळाही बंद आहे. मात्र, बुलडाण्यातील चिमुकल्यांनी झेंडावंदन केलं आहे. शिक्षक आणि पालकांनी दिलेली शिकवण आणि त्यांचे देशावरील प्रेम बघायला मिळाले आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोणा प्रादुर्भावामुळे सर्वकाही ठप्प झाले आहे विशेषता कामकाजाचे वर्क फ्रॉम होम होत असताना सर्वात जास्त विद्यार्थी चिमुकले विद्यार्थ्यांना याची झळ बसत आहे. कारण ज्या चिमुकल्या वयात शाळेमध्ये होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलन 15 ऑगस्ट 26 जानेवारी गांधी जयंती यासह विविध शालेय कार्यक्रमांमध्ये चिमुकले विद्यार्थी हिरीरीने भाग घेतात. पण आज शाळाच ठप्प झाल्याने त्यांचा हिरमोड झालेला दिसून येतो. पण त्यात आज आमचा प्रतिनिधी तेव्हा फेरफटका मारत असताना त्याच्या कॅमेरा हे हे चिमुकले 26 जानेवारीचा उत्साह आपल्या घरा समोरील कॉलनीत देखील तेवढ्याच आनंदाने सादर करताना टिपले गेले.

आज 26 जानेवारी आम्ही आज आपला 73 गणतंत्र दिवस साजरा करीत आहोत आणि खरोखर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारतमाता आणि भारताचा तिरंगा याबद्दल किती प्रेम अभिमान आणि गर्व आहे. ते आज आम्हाला पाहायला मिळाले मागील दोन वर्षापासून करोणा काळामुळे संपूर्ण शाळा बंद होत्या आजही बंदच आहेत. परंतु त्या शाळेमध्ये त्या शाळेने त्या शाळेतील शिक्षकांनी आणि आई-वडिलांनी आपल्या मुलांना जी देशभक्ती शिकविली त्याचं जागृत दर्शन आज आम्हाला ऐका ओपन स्पेसच्या पटांगनात झेडा वंदन होईल. तिथे रांगोळी काढुन भारत माता कि जय असे स्लोगन लिहत राष्ट्भक्ती करत हि चिमुकली मुल  दिसली.

Exit mobile version