Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिननिमित्ताने ध्वजारोहण

यावल प्रतिनिधी । आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या 136 व्या वर्धापन दिन यावल येथे शेतकी संघ काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. तसेच यावेळी संघाच्या प्रांगणात पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कमिटीचा ध्वजारोहण करण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ काँग्रेस नेते हाजी शब्बीर खान मोहम्मद खान व इंटककचे जिल्हाध्यक्ष  भगतसिंग देवनाथ पाटील यांचा तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हाजी शब्बीर खान, प्रभाकर सोनवणे, भगतसिंग पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत कॉंग्रेस पक्षाचा १३६ वर्षाचा इतिहास व स्वातंत्र्याच्या लढ्यात पक्षाचे आणी पक्षाची ध्येयधोरण मांडलीत.

यावेळी कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन नितीन चौधरी, यावल तालुका खरेदी विक्री शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, शहराध्यक्ष कदिर खान, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, सरपंच परिषद मुंबई या संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा वढोदे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप सोनवणे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, अट्रावल ग्राम पंचायतचे सरपंच मोहन बाविस्कर, प्रा. जि. पी. पाटील, पुंडलिक बारी, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शाह, जेष्ठ माजी नगरसेवक गुलामरसूल मेंबर, नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेवक समीर मोमीन, असलंम मेंबर, समीर खान, फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई, नईम शेख, इखलास सय्यद, रहेमान खाटीक, माजी नगरसेवक कालु मास्टर, विक्की गजरे, अशोक पाटील, विक्की सोनवणे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपास्थितांचे आभार खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड यांनी मानले.

 

 

Exit mobile version