Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कळमसरे येथील महावितरण कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कळमसरे येथील महावितरण कंपनीच्या कक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी कक्ष अभियंता किशोर संभाजी सुर्वे ह्यांचे हस्तेझेंडा वंदन करण्यात आले.यावेळी प्रधान तंत्रज्ञ प्रविण सुरेश पाटील व सर्व वीज वितरण कंपनी चे कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतिश पाटील मुकेश माळी, चेतन राजपूत यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान कळमसरे येथील जिल्हा परिषद शाळेत कळमसरेच्या कक्ष महावितरण कडून बाल गोपाळांना गोळ्या बिस्कीट व चॉकलेटच देखील वाटप करण्यात आले. दुसरीकडे ग्रामपंचायत कळमसरे येथील स्वतंत्र भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ नागरिक व सरपंच यांचे वडील भाईदास भाऊसिंग निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच जगदीश निकम उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चौधरी, मीराबाई बडगुजर, मीना कुंभार, लताबाई भील, रेश्माबाई चौधरी, गणेश चौधरी, संदीप पाटील, दिनकर चव्हाण, पल्लवी चौधरी तसेच ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील तसेच गावातील ज्येष्ठ निवृत्त शिक्षक किसनसिंग पाटील तसेच आरोग्य सेविका, पशुवैद्यकीय डॉक्टर, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,आशा सेविका, तलाठी कोतवाल, शारदा विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version