Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रमाई घरकुल योजनेसाठी अधिकाऱ्यांकडून पाच हजाराची मागणी; लाभार्थ्यांची तक्रार

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील शेरी येथे रमाई घरकुल योजने अंतर्गत अकरा लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले असून तीन लाभार्थ्यांनी घरकुल टेबलवर काम करणारे अधिकाऱ्याला पाच हजार रुपये दिले नाही म्हणून धनादेशचा चेक दिला जात नाही. यासंदर्भात लाभार्थ्यांनी पंचायत समिती विस्तार अधिकारी अशोक पालवे यांच्याकडे केली आहे.

जामनेर पंचायत समितीमध्ये कर्मचारी हे लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय काम करत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. त्याचबरोबर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उपोषण करण्यात आले होते. याच्या प्रथम पुन्हा शेरी येथील लाभार्थ्यांना आला आहे. शेरी येथील ११ जणांना रमाई घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले असून त्यापैकी सिद्धार्थ शंकर दाभाडे, विकास रंगनाथ सोनवणे, युवराज सापोडा दाभाडे या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम ओटा लेवल केले आहे. व घरकुलाचा पहिला धनादेशाचे हप्ता मागणीसाठी वारंवार संबंधित टेबलवर गेल्यानंतरही पहिला हप्ता मिळाला नाही, कारण जामनेर पंचायत समितीमध्ये घरकुल टेबलवर काम करणारे विक्रम वाकडे हे सांगतात की, आम्हाला पाच हजार रुपये द्या तर तुमच्या धनादेशाच्या चेक मिळेल असे सांगितले. यासंदर्भात आज सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी जामनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक पालवे यांच्याकडे लाभार्थी व गावातील ग्रामस्थ यांनी केली आहे. त्याचबरोबर घरकुल टेबल वरचे विक्रम वाकडे त्यांना ज्या लोकांनी पैसे दिले त्यांचे प्रस्ताव नसतानाही घरकुल मंजूर केल्याच्या तक्रारी केले आहे.  या सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करा अन्यथा उपोषण करू असा इशारा लाभार्थी व ग्रामस्थांनी दिला आहे. जर अशाप्रकारे प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये संबंधित अधिकारी मागत असतील तर गरिबांना शासन योजना देते मात्र पंचायत समिती कर्मचारी त्यांची लूट करीत असल्याच्या दिसून येत आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 

Exit mobile version