Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राम रहीमसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

चंदीगड वृत्तसंस्था | सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरूमीत राम रहिम याच्यासह त्याच्या अन्य चार साथीदारांना न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी न्यायालयने राम रहिम दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. बाबा राम रहिम यांच्याबरोबरच त्यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.

सीबीआयच्या स्पेशल कोर्टात गुरमीत राम रहीम यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर चार आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्यांच्या सहकार्‍यांना कोर्टात ८ ऑक्टोबरलाच दोषी ठरवण्यात आलं होतं. पण कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. कोर्टाकडून आज निकालाचं वाचन करण्यात आले. यात राम रहिमसह साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

Exit mobile version