Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे अकरा आमदार गेले पण पाच परतले !

मुंबई प्रतिनिधी । आज सकाळी अजित पवार यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे अकरा आमदार उपस्थित असले तरी त्यातील पाच पुन्हा पक्षाकडे परतले असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्या पाठीशी धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे हे नेते उभे असल्याचे चित्र आज पहाटेपासूनच दिसून आले. याशिवाय, त्यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे एकूण अकरा आमदार उपस्थित होते. यापैकी डॉ. राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर आणि सुनील भुसारी हे शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू असतांनाच परतले. यानंतर अजून दोन आमदार परतले असून इतरांशी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला असल्याची माहिती आता समोर आली आहे. म्हणजेच तूर्तास राष्ट्रवादीच्या एकूण ५४ आमदारांपैकी सहा आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अन्य आमदार फुटू नयेत यासाठी पक्षातर्फे काळजी घेण्यात येत असून आज दुपारी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version