Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : एरंडोल नगरपालिका क्षेत्रात पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ ते २८ मार्च असे पाच दिवसांचा एरंडोल नगरपालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आज काढले आहे 

जिल्ह्यासह एरंडोल तालुक्यात आता कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नागरीक कोरोनाच्या नियमांचे पालन करतांना दिसून येत नसल्याने गर्दी करतांना दिसून येत आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एरंडोल नगरपालिका क्षेत्रात  बुधवार २४ मार्च ते २८ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात येत असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी यांनी असे आदेश आज सकाळी काढले.

तालुक्यात निर्बंध याप्रमाणे राहतील

* सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद राहतील.

* किराणा दुकाने इतर सर्व दुकाने बंद राहतील,

* किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.

* शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद राहतील.

* हॉटेल, रेस्टॉरंट (पार्सल वगळता) बंद राहील

* सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतीक, धार्मीक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.

* शॉपींग मॉल्स, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप बंद राहतील.

* गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव,  प्रेक्षणगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील. 

* पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे ठिकाणे बंद राहतील.

या व्यतिरिक्त दुध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार, सेवा मेडीकल स्टोअर्स, ॲम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटना यांना सुट देण्यात आली आहे. तसेच २४ ते २८ मार्च दरम्यान होणारे पुर्व नियोजित परिक्षा असल्याने परीक्षेच्या कालावधीत परिक्षार्थी व परिक्षेकरीत नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना निर्बंधातून सुट राहणार आहे. दरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहे.

Exit mobile version