Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथील ३५ गणेश मंडळाच्या पाच दिवसीय श्री गणेशाचे उद्या विसर्जन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शहरातील २० तर यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील १५ अशा ३५ पाच दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रविवारी विसर्जन होत आहे. यावर्षी कोरोना संसर्गाचे संकट हद्दपार झाल्याने सार्वजनिक उत्सवावर कोणतेही बंधने नसल्याने तरुणाईमध्ये दांडगा उत्साह दिसून येत आहे.

यावल शहरात गेल्या अनेक वर्षापासून पाच दिवसीय गणेशोत्सवाची परंपरा आहे. शहरात पाच दिवशीय गणेशोत्सवाची परंपरा आज देखील कायम आहे. शहरात २० सार्वजनिक तर एक खाजगी असे १५ गणेश मंडळानी श्रीची स्थापना केली आहे. रविवारी ही सर्व गणेश मंडळे उद्या विसर्जन करणार आहेत.

रविवारी दुपारपासून यावल शहरातील मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. येथील पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी पोलीस बंदोबस्ताची रूपरेषा आखली असून रविवारी सकाळपासून शहरात पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

शहरा व्यतिरिक्त पोलीस ठाण्याच्या हद्यितील पाच दिवसीय गणेशोत्सवामध्ये नायगाव (१), कोरपावली (४), डांभुर्णी (६), दहीगाव (३), सावखेडासीम (१) येथील श्री चे विसर्जन होणार आहे. परंपरेनुसार साकळी येथील श्री गणेशाचे  गौरी विसर्जनाच्या दिवशीच गणेश विसर्जन होत असल्याने येथील तीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे सोमवारी विसर्जन होणार आहे. श्री गणरायाच्या निरोपाच्या विर्सजन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शना पोलीसांचा बंदोबस्त राहणार आहे.

Exit mobile version