Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘फिट इंडिया’ची मुहूर्त मेढ

WhatsApp Image 2019 08 29 at 7.22.06 PM

जळगाव, प्रतीनिधी | जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलावर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया कॅम्पईनची मुहूर्त मेढ दिल्ली येथे केली असता जळगाव ला सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

सर्व प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या तैल चित्राला पुष्पांजली जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी वाहिली. त्यानंतर एकलव्या पुरस्कार प्राप्त कांचन चौधरी,राष्ट्रीय खेळाडू नूतन शेवाळे,प्रा डॉ कोल्हे,यांनी वाहिली. इम्रान शेख यांनी मेजर ध्यानचंद चा इतिहास सादर केला. फारूक शेख यांनी उपस्थित सर्व खेळाडू,क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा पटू कडून इंडिया फिट अंतर्गत शपथ वदवून घेतली त्यात व्यसन न करता खेळ व व्यायाम करेल व आपले स्वास्थ चांगले ठेवेल याचा अंतर्भाव होता प्रास्ताविक सौ रेखा पाटील व आभार अरविंद खांडेकर यांनी मानले.

Exit mobile version