‘बँको ब्लू रिबन’ ऑल इंडिया अर्बन बँक श्रेणीत श्री व्यास सहकारी बँकेला प्रथम पारितोषिक

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेला अविज पब्लिकेशन्स कोल्हापूर, इनमा गॅलेक्सी पुणे आणि बँकोतर्फे ‘बँको ब्लू रिबन २०२१’चे ऑल इंडिया अर्बन बँक श्रेणीत नुकतेच प्रथम पारितोषिक मिळाले आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाणी यांनी आज येथील बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

लोणावळा येथील हॉटेल रेडीसन मध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात  श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेस अर्बन बँकात “बँको ब्लू रिबन २०२१ ” ऑल इंडिया अर्बन बँक ५० कोटी रुपये पर्यंतच्या ठेवी कॅटेगिरी मध्ये प्रथम क्रमांकाच्या पूरस्काराने सन्मानीत करण्यात आले. रिझर्व बँक ऑफ इंडिया (मुंबई)चे चिफ जनरल मॅनेजर काळे, बँकेचे अविनाश शिंत्रे गुंडाळे, नाईक (पूणे) यांच्या हस्ते बँकेला सन्मानित करण्यात आले.

श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या वतीने हा पुरस्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाणी यांनी हा स्वीकारला. या लोनावळा येथे पार पडलेल्या तीन दिवसीय परिषदेत १० राज्यातील ५५० विविध बँकांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

सदरील पुरस्कार बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे संस्थापक (कै.)अण्णा साहेब अट्रावलकर यांच्या स्मृतीस , बँकेचे सभासद व ग्राहक यांना समर्पित केला आहे असेही पत्रकारांशी बोलतांना चंद्रकांत वाणी यांनी सांगितले. बँकेस स्थापनेपासून सतत “अ” वर्ग प्राप्त आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून, बँक सतत नफ्यात आहे. बँकेने थकीत कर्जावर अंकूश ठेवून दरवर्षी सभासदांना लाभांश वितरीत केला आहे.

श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या ठेवी साडे तेरा कोटी, कर्ज वितरण सव्वा आठ कोटी, गुंतवणूक पाच कोटी३७ लाख असून बँक सक्षम व भक्कमपणे उभी असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाणी यांनी सांगितले. प्रसंगी बँकेचे अध्यक्ष शरद यावलकर, उपाध्यक्ष दिलीप नेवे, संचालक हेमंत चौधरी, किरण अट्रावलकर, अभिमन्यू बडगुजर, महेश वाणी, डॉ. सतिष यावलकर, शांता वाणी, जगदीश कवडीवाले आदि उपस्थित होते.

 

Protected Content