जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत साकळी येथील दिपाली महाजनला प्रथम पारितोषीक

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषदेअंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत शालेय जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत दिपाली महाजन हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळविले आहे. 

कोरोना संसर्गाचा धोका पाहता विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदर स्पर्धा शालेय स्तरावर घेण्यात आलेली होती. या स्पर्धेत शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. दिपाली नरेश महाजन (इ.११ वी) तिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळालेले आहे. १० हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. तिला शाळेचे जेष्ठ कलाशिक्षक जे.पी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.  दिपाली हिच्या उत्तुंग यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव महाजन, उपाध्यक्ष वसंतराव पाटील, माजी जि.प.सदस्या तसेच संचालिका विद्याताई महाजन, कार्याध्यक्ष सुभाष नाना महाजन यांचेसह सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे प्राचार्य जी.पी. बोरसे, ज्येष्ठ शिक्षक पि.के. बिरारी  यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टॉप ने कौतुक केले आहे तसेच कु.दिपाली हि जिल्हास्तरीय स्पर्धेच्या बक्षिसाची मानकरी ठरल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content