Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरारच्या अगासी तीर्थात आइजाचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशेन ; हार्दिक हुँडीया

WhatsApp Image 2019 09 16 at 8.37.49 AM

चोपडा , प्रतिनिधी | ऑल इंडिया जैन जर्नलिस्ट असोसिएशन म्हणजेचेच आईजाचे पाहिले राष्ट्रीय अधिवेशन राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया यांच्या नेतृत्वाखाली विरार येथील प्राचीन अगाशी तीर्थ येथे २१ व २२ सप्टेंबर ला होणार आहे .

स्वामी दादाच्या छत्र छायेत आणि प्रसिद्ध जैनाचार्या यशोंवरम सूरिश्वरजी महाराजच्या सानिध्यात श्वेतांबर, दिगंबर, तेरापंथी आणि स्थानकवासी असे चारही संप्रदायांचे संताच्या आशीर्वादाने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, तमिलनाडु, तेलंगाना, उत्तर प्रदेश, छत्तिसगढ, दिल्ली अश्या अनेक राज्यातून जैन पत्रकार अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती आईजाचे राष्ट्रीय महामंत्री महावीर श्रीश्रीमाळ यांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुँड़ियानी सांगितले की, या अधिवेशनात विश्वचे अनमोल त्याग आणि तपश्याचे जैन धर्मात जो धर्माच्या नावावर जीव दया च्या नावावर भगवानची प्रतिमा रात्रीतून एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वर घेऊन जात आहे आणि आपला धंदा करून घेत आहे त्यांना समाजाच्या समोर आणायचे आहे हा मुख्य उद्देश असणार आहे.  जैन साधू संताना रस्त्यावर पायीं चालताना जो त्रास होत आहे तो त्रास कसा कमी करता येईल यासाठी देशातील प्रत्येक संघात विचारपूस करणार आणि जैन मंदिरात असणारे पुजारीचे आईजा परिवारातर्फे सन्मान करण्याचे नियोजन करणार आहोत. दोन दिवशीय अधिवेशनात ज्या जैन पत्रकाराने जैन धर्मासाठी उल्लेखनीय कार्य केले असेल अश्या जैन पत्रकारांचे आईजा कलमकार म्हणून सन्मान होणार आहे असे आईजाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी मानकमल भंडारी यांनी सांगितले. हा कार्यक्रमात देशाचे प्रसिद्ध उद्योगपती मनीष मेहता, वरिष्ठ साइबर क्राइमचे धाराशास्त्री पंकज बाफ़ना, हीरे आणि स्टोन व महावीर जैन विद्यालयाचे ट्रस्टी परिमल झवेरी , स्किन स्पेसियलिस्ट डॉ. रचना फाड़िया, वरिष्ठ पत्रकार अभय कोटेचा यासारखे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध जैन तीर्थ नाकोड़ाचे चेअरमन रमेशमुथा व विरारचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचे सुपुत्र आमदार क्षितिज ठाकुर, पत्रकारीता जगतात ३५ वर्ष पूर्ण करणारे दिलीप शाह यांचाही सन्मान होणार असल्याचे आईजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप कावेरिया यांनी सांगितले. २१ तारखेला सकाळी ११ वाजता सर्व जैन पत्रकार ढोल ताश्याचा गजरात मंदिरात जावून भगवानचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. चारही संप्रदायाचे जैन पत्रकारांचा देशातील प्रथम राष्ट्रीय अधिवेशनला सफल करण्यासाठी महाराष्ट्र येथून दिलीप कावेरिया, दिल्ली येथून कपिल जैन, मध्यप्रदेश येथून प्रदीप जैन, राजस्थान येथून रवी पूँगलिया, तेलंगाना येथून दिनेश जैन , छत्तीसगढ़ येथून प्रदीप पगारिया, तमिलनाडु येथून दिनेश सालेचा, गुजरात येथून अल्पेश शाह , उत्तरप्रदेश येथून वैभव जैन अश्या अनेक राज्यातून जैन पत्रकाराचे अनमोल योगदान मिळत आहे असे झाबुआ येथील पवन नहार यांनी सांगितले. तरी या अधिवेशनात खान्देशातून जैन पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लतीश जैन यांनी केले आहे.

Exit mobile version