Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अगोदर कंगना नंतर सोमय्या आणि आता नवनीत राणा… – केंद्रानं दिली सुरक्षा व्यवस्था

अमरावती – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । कंगना राणावत, किरीट सोमय्या आणि आता अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना केंद्रानं सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन नंतर केंद्राकडून खास सुरक्षाकवच पुरवण्यात आलेल्यांच्या यादीत आता खासदार राणा यांचं नाव जुळलं आहे. त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केली आहे.

वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेत एसपीओ, एनएसजी कमांडो, सीआयएसएफचे बंदुकधारी जवान असे एकूण 11 कमांडो तैनात असतात. यासह शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ असा ताफाही असतो. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षेच्या धोक्याबाबत जे अहवाल मिळतात त्यावर केंद्रीय गृह मंत्रालय हे निर्णय घेत असतं.

निवडून येण्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीनं नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता मात्र अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यानी भाजपशी सलगी साधत महाविकास आघाडी सरकारवर त्यातही शिवसेनेवर कायम टीका करीत असतात. अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात खासदार राणा आणि स्थानिक पोलीस यांच्यात वाद निर्माण झाला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना मिळालेल्या केंद्रीय सुरक्षानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Exit mobile version