Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात युवकावर गोळीबार

firing in bhusawalजळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी घ्यायला तरुणावर दोघांनी गोळीबार करून जखमी केल्याची घटना खडका रोड चौफुली येथे घडली असून जखमीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की खलील अली मोहम्मद शकील (वय २५ रा. गेंदालाल मिल जळगाव) हा भुसावळ येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी दुपारी गेला होता. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास खडका रोड चौफुलीवरून तो परतत असताना विकी नामक तरुण आणि एक तरुणांनी बंदूक हातात घेऊन तीन गोळ्या हवेत तर दोन गोळ्या जमिनीवर झाडल्या. यासोबत दोन गोळ्या खालीलच्या डाव्या हाताच्या दंडावर झाडल्याने तो जखमी झाला आहे. त्याला जखमी अवस्थेत नातेवाइकांनी तातडीने खासगी वाहनाने भुसावळून जिल्हा वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. गोळीबार करण्याचा मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Exit mobile version