Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कळवा भागातील मेडिकलमध्ये गोळीबार ; एक ठार

gun

 

ठाणे वृत्तसंस्था । मेडिकलमध्ये चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या अनोळखी व्यक्तीने दुकानात झोपलेल्या २६ वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कळवा पूर्व भागात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मारेकऱ्याचा शोध घेतला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रेमसिंग उर्फ जितेंद्र सिंग मोतिसिंग (वय २६) असे मृत्यु तरुणाचे नाव तो मेडिकलमध्ये झोपला होता. या तरुणाला अचानक जाग आली. त्याचवेळी चोरट्याने त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती मिळताच, कळवा पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मारेकऱ्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेतील धागेदोरे हाती लागले असून, तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version