Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांतर्फे फटाक्यांची आतिशबाजी

पहूर ता. जामनेर (रविंद्र लाठे) पहूर येथे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला अखेरचा रामराम ठोकत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यानिमित्त पहूर बसस्थानकावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. 

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवा अध्यक्ष शैलेश पाटील, सुकलाल बारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी साखर वाटप केली. उपसरपंच श्याम सावळे, शहराध्यक्ष आशिष माळी, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक राजू जेंटलमन, युवा कार्यकर्ते किरण भास्कर पाटील, ग्राम पंचायत सदस्य शरद पांढरे, दीपक लोढा, राजु किसन पाटील,  प्रल्हाद वानखेडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पहूरकरांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी अनुभवली . राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , काँग्रेस  पदाधिकाऱ्यांनी नाथा भाऊंचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जल्लोषात स्वागत केले . याप्रसंगी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता .

Exit mobile version