Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शॉर्टसर्किट होवून शेतातील मक्याला आग, १ लाखाचे नुकसान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हाडदे शिवारात शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉटसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव कुऱ्हाडदे येथील सागर दादाजी नरोटे वय २८ यांचे कुऱ्हाडदे शिवारात ३ एकर  शेती आहे. या  शेतात त्यांनी मका लावलेला आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतावरुन गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉर्टसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागली. नेहमीप्रमाणे सकाळी शेतकरी सागर नरोटे हे शेतात येत असताना त्यांना मक्‍याला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी शेतातील इतर कामगारांची सोबत पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर आग विझवली.  या आगीत शेतातील एक एकरातील  ४० क्विंटल एवढा १ लाख रुपये किंमतीचा मका खाक झाला. याबाबत शेतकरी सागर दादाजी नरोटे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील हे करीत आहेत. दरम्यान पोलीस कर्मचारी अथवा शेतकरी उपस्थित नसताना महावितरण विभागाने परस्पर पंचनामा केल्याची तक्रार शेतकरी सागर नरोटे यांनी बोलताना केली असून मदत मिळावी अशी मागणी सुद्धा केली आहे.

Exit mobile version