खोटे नगर परिसरात आग; अग्निशमन दलाने आणले आगीवर नियंत्रण

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील खोटे नगर स्टॉप जवळील एका फर्निचरच्या दुकानाला पहाटे २.३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबाच्या १२ फेऱ्या करत पहाटे ५ वाजेपर्यंत नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले.

खोटे नगर स्टॉप जवळील शिव फर्निचर या लाकूड दुकानाला बुधवार दि. १८ मे रोजी पहाटेच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून महाबळ आणि गोलाणी मार्केट येथील फायर स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब लागलीच घटनास्थळी रवाना झाले. यात गोलाणी मार्केटमधून ३ व महाबळ फायर स्टेशन मधून १ गाडीचा समावेश होता. या बंबांनी १२ फेऱ्या करत आग आटोक्यात आणली. ही आग एवढी भीषण होती की ती १ किलोमीटर पासून दिसत होती. आगीत शिव फर्निचर या दुकानातील सहा.अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, हेड फायरमन अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भारत बारी वाहन चालक देविदास सुरवाडे,वाहन चालक-संतोष तायडे, संजय भोईटे, वाहन चालक-प्रदीप धनगर,सरदार पाटील, भगवान पाटील, वसंत कोळी,जगदीश साळुंखे या अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे ५ वाजेपर्यंत १२ बंबांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणील.

Protected Content