Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोविड हॉस्पीटलला आग; पाच रूग्णांचा होरपळून मृत्यू

राजकोट वृत्तसंस्था । येथील शिवानंद कोविड हॉस्पीटलला रात्री लागलेल्या आगीत पाच रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण भाजल्याने जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, राजकोट येथील शिवानंद कोविड हॉस्पीटलमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रात्री उशीरा या रूग्णालयास अचानक आग लागली. काही क्षणातच हॉस्पीटलमध्ये आगीने विक्राळ स्वरूप धारण केले. याची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन यंत्रणेने प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. तथापि, या दरम्यान पाच कोविड रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण यात भाजले गेले आहेत. यातील जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

शिवानंतर कोविड हॉस्पीटलमध्ये आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नसली तरी पोलीसांनी याचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version