Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर मंत्री मदन येरावार यांच्यावर गुन्हा दाखल

madan yeravar यवतमाळ प्रतिनिधी । न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह एकूण १७ जणांच्या विरोधात मालमत्तेच्या बोगस कागदपत्रांच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालच यवतमाळ येथील न्यायालयाने मदन येरावार यांच्यासह १६ अन्य संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानुसार रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चित्तरंजन कोल्हेसह १२ जणांनी मिळून तत्कालीन भूमिअभिलेख उपअधीक्षक, सहायक दुय्यम निबंधक यांच्या साहाय्याने जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून पालकमंत्री मदन येरावार,अमित चोखानी यांना मालमत्ता हस्तांतरित केली होती. या प्रकरणी आयुषी किरण देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवरील सुनावणीत बुधवारी न्यायालयाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मदन येरावार यांच्यासह १६ जणांवर ४२०,४२६,४६५,४६८,४७१ आर/डब्ल्यू ३४ आणि १२० (ब) कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह भाजप नेते आणि जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, जयश्री ठाकरे, विजयश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री संजय देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, अमित चोखानी, तत्कालीन भूमिअभिलेख अधिकारी, तत्कालीन नगर परिषद सीईओ आदींचा समावेश आहे.

Exit mobile version