आचारसंहितेचे उल्लंघन; देवरांच्या विरोधात गुन्हा

मुंबई प्रतिनिधी । आचारसंहितेचे उल्लंघन केल्यावरून काँग्रेसचे उमेदवार मिलींद देवरा यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काँग्रेसचे दक्षीण मुंबई मतदारसंघाचे उमेदवार मिलींद देवरा यांनी जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान भुलेश्‍वर येथील सभेत केले होते. यामुळे शिवसेनेच्या वतीने अ‍ॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी ८ एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि १७१ आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल भादंवि १२५ या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Add Comment

Protected Content