Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनुराग कश्यपवर बलात्काराचा गुन्हा दाखल

FIR

मुंबई – चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात रात्री लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘फ्रीडम’ या चित्रपटादरम्यान पीडित अभिनेत्रीची भेट कश्यपसोबत झाली होती. त्यावेळी तो ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याच दरम्यान (२०१४-१५ मध्ये) हा प्रकार घडल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणीना घडलेला प्रकार सांगितल्यावर याबाबत वाच्यता करू नको असा सल्ला तिला त्यांच्याकडून देण्यात आला. तसेच टिष्ट्वटरवरील पोस्ट घरच्यांनी तिला डिलीट करायला लावली असे तिचे म्हणणे आहे.

पीडितेने तिचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यासोबत वर्सोवा पोलीस ठाण्यात मंगळवारी जाऊन कश्यपविरोधात लेखी तक्रार दिली. तसेच त्याच्याविरोधात बलात्कार तसेच अन्य गंभीर कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार रात्री उशीरा कश्यपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version