Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरांची कत्तल करणार्‍या चौघांवर गुन्हा

FIR

जळगाव प्रतिनिधी । शहरातल्या इक्बाल कॉलनीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये गुरांची कत्तल करून मांस बाळगणार्‍या चार जणांविरूद्ध एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, मेहरूण शिवारातील इक्बाल कॉलनीत गुरांची कत्तल करून त्यांच्या मांसची विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विनायक लोकरे यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, विजय नेरकर, मुद्दसर काझी, विजय बावस्कर, भारती देशमुख आदींना इक्बाल नगरात रवाना केले. यावेळी या पथकाला इक्बालनगरकडे जाणार्‍या पूलाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांना शरीफ शेख उर्फ भोल्या रशीद शेख, मोहम्मद इम्रान शेख रशीद शेख, शेख आसीफ शेख रशीद,नाजीम शेख रशीद शेख हे चौघं गुरांची कत्तल करून त्यांचे मांस बाळगताना आढळून आले़. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version