Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रॅनाईट खरेदीच्या नावाखाली २.९२ लाखांची फसवणूक

chitra chauk accident

जळगाव प्रतिनिधी । ग्रॅनाईटसाठी २.९२ लाख रूपये घेऊन माल न देण्याचे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत जळगावातल्या टागोरनगरातील चंद्रकांत वसंत पाटील (वय ४०) या बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. बांधकामाचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना ग्रॅनाईटची नेहमी आवश्यकता पडते. या अनुषंगाने ते आंध्रप्रदेशातील मातूर आणि ओगल येथून ग्रॅनाईटची खरेदी करत असतात. अलीकडेच ते आंध्रप्रदेशाच्या करीमनगर जिल्ह्यातील मातूर ओंगल येथे गेले असता त्यांची कालू दास (पूर्ण नाव माहिती नाही ) व मुंबईतील भगवती ग्रॅनाईटचे मालक (नाव ज्ञात नाही) यांच्याशी ओळख झाली. यानंतर कालू दास यांच्याशी त्यांचा मोबाईलवरून संपर्क झाला. त्याने पाठविलेले ग्रॅनाईटचे सँपल आवडल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी त्याला तीन लाख ९२ हजार रूपयांच्या मालाची ऑर्डर दिली. यासाठी त्यांनी प्रारंभी बी. नागा सौजन्या; अटलुरी-बेनू बाबू व डी. साई या नावाने असणार्‍या बँक खात्यांवर प्रत्येकी ४८ हजार रूपये पाठविले. तर उर्वरित २.४८ लाख रूपये कालू दास यांच्या अकाऊंटवर पाठविण्यात आले. हे ट्रान्सफर एप्रिल महिन्यातील ९ आणि १० तारखांना करण्यात आले. यानंतर मात्र त्याने ग्रॅनाईट पाठवले नाही. यामुळे चंद्रकांत वसंत पाटील यांनी आज जिल्हापेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Exit mobile version