Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोण रे तू ? तू तर मच्छर ! : केतकी चितळे ट्रोल; गुन्हा दाखल

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोशल मीडियावरून केलेल्या वक्तव्यांनी नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे हीच्या शरद पवारांवरील आक्षेपार्ह शब्दातील टिकेने वादंग निर्माण झाले आहे. या प्रकरणी आता तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळे ही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सक्रीय असणारी अभिनेत्री आहे. आता ती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील अतिशय खालच्या स्तरावरच्या टिकेने चर्चेत आली आहे. फेसबुकवर अभिनेत्री केतकी चितळे हीनं शरद पवारांच्या आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली आहे. वकील नितीन भावे यांनी लिहलेली कविता तिने आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हीनं नितीन भावे यांची कविता शेअर केली असून ती खालील प्रमाणे आहे.

तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा ॥
ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे ॥
समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप ॥
ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर ॥
भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा ॥
खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड ॥
याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड ॥

अशी भावे यांची कविता केतकीने शेअर केली आहे. तिने आपल्या फेसबुक पेजवरून कॉमेंट ऑफ केल्या असल्या तरी हा संदर्भ घेऊन फेसबुकसह अन्य माध्यमांवरून तिला तुफान ट्रोल केले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची ‘डोंगराचे ढोल’ या संग्रहातील ‘पाथरवट’ ही कविता लोकांसमोर सादर केली होती. त्याचा संदर्भ केतकीच्या पोस्टला आहे. यामुळे सोशल मीडियात केतकीचे समर्थक आणि विरोधक भिडल्याचे दिसून येत आहे.
याआधीही केतकी चितळेने केलेल्या पोस्टमुळे वादात सापडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होतं. त्यामुळे तिच्यावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. तर आता शरद पवारांविरोधात केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे चर्चेत आली होती. दरम्यान, आता केलेल्या पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version