Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्जवाटप घोटाळा : अजित पवारांसह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Ajit Pawar

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक २५ हजार कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ यांच्यासह पवारांसह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज हायकोर्टाने दिले आहेत.

 

अजित पवारांवर कलम ८८ नुसार नियमबाह्य कर्ज वाटप करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज्य सहकारी बँकेच्या ७७ संचालकांसह १० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना सहकार खात्याकडून यापुढे बँक डबघाईला आणल्या प्रकरणी जबाबदारी निश्चित होऊन आगामी दोन टर्म म्हणजे १० वर्षं आपल्याला निवडणूक लढवण्यास बंदी का घालू नये अशा आशयाच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. अजित पवार यांच्याबरोबर बँकेच्या ७७ माजी संचालकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान, राज ठाकरे यांच्या ईडी चौकशी नंतर आता राष्ट्रवादीचे बडे नेते अडचणीत आले आहेत.

Exit mobile version