Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘स्व’ चा शोध घ्या पुढे जा – चंद्रकांत भंडारी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |जी मुल स्वतःतील गुणदोषांचे  दररोज मूल्यमापन करत मैने करके देखा, मै समझ गया हा मंत्र सतत मनात घोळत ओठांशी सतत संवाद साधत स्वतःच्या प्रगतीबाबत सदैव जागृत असतात ती मूल अभ्यासासह इतर कार्यांमध्ये पुढे जात हमखास यशस्वी होतात असं प्रतिपादन केसीई सोसायटीची शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी केले.

 

प्रतीक क्लासेसतर्फे दरवर्षी इयत्ता दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  दिवाळी कॅम्प घेतला जातो.  क्लासचे संचालक सी. एल.पाटील व मॅडम यांनी गेल्या १७- १८  वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम जळगावात सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसी संवाद साधत असता भंडारी यांनी जगप्रसिद्ध पेन मेकर पार्करचे तसेच इयत्ता दहावी शिकणाऱ्या एका अपंग विद्यार्थिनीचे उदाहरण देत स्वचा शोध घेतला विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे हे उदाहरणासह सांगितले.  त्यात त्यांनी वयात येणाऱ्या मुलांना जे शारीरिक – मानसिक बदल होतात त्यांची शास्त्रीय माहिती देत सांगितले की मुलांनी लोक काय म्हणतील,  लोकांनी  चांगलं म्हणावं म्हणून उगाचच काहीतरी मनाविरुद्ध करावं   धास्तावलेलं राहत तुलना करत स्वतःला कमी लेखावे या गोष्टी मनावर न घेता प्रेरणा व सुधारणा या उक्तीनुसार पुढे जावे व कमीपणाचा गंड बाजूस सारावे हे उदाहरणासह पटवून दिले.  प्रतीक क्लासचे श्री. पाटील यांनी आभार मानले.

 

Exit mobile version