Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना उपचारात खाजगी रुग्णालयांकडून आर्थिक पिळवणूक

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील खाजगी रुग्णालय कोरोनाचा उपचार करतांना अवाजवी बिल आकारणी करत असून यासंदर्भात समिती अथवा वॉर रूम तयार करून या गैरप्रकाराला आळा घालावा अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, शहरातील काही खाजगी रुग्णालये कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांकडून रुग्णला दाखल करताच ऍडव्हान्स स्वरूपात लाख लाख रुपये घेत असल्याची तक्रार जितेंद्र मराठे यांनी केली आहे. लॉकडाऊन च्या काळात अनेकांनी जवळचे पैसे खर्च करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. यात कुटुंबातील सदस्यास कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णलयात उपचार घ्यावे लागत आहे. काहींनी कोरोना विमा पॉलिसी काढून ठेवली आहे. मात्र, खासगी रुग्णालय ही पॉलिसी असतांना देखील नातेवाईकांना आगोदर रोख स्वरूपात रक्कम भरण्यास सांगत आहेत. खाजगी रुग्णलयांना कोरोना विमा पॉलिसी लागू करण्यास सांगावे अशी मागणी करण्यात आली आहे.

खाजगी रुग्णलायतील मुख्य डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना भेट नाहीत. ते नवीन शिकाऊ डॉक्टरांना रुग्ण हाताळण्यास सांगत असतात तसेच नातेवाईकांना रुग्णांची व्ययस्थित माहिती देत नाहीत. यासाठी खाजगी रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णास बघता येईल अशी सूचना श्री. मराठे यांनी केली आहे.

Exit mobile version