Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर साताऱ्यातून महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महायुतीकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरूध्द होणार आहे. महायुतीत या जागेवरून वाद सुरू होता.

महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी जागेवर दावा ठोकला होता. पण आता भाजपने सातारा मतदारसंघाची जागा आपल्याकडे ठेवली आहे. उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी मिळण्याआधीपासून प्रचार ही सुरू केला होता. त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

भाजपने १६ एप्रिल रोजी आज आपली बारावी यादी जाहीर करून त्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार उदयनराजे भोसले यांचे नाव सातारा लोकसभा मतदारसंघातून जाहीर करण्यात आले. साताराचे सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

 

 

Exit mobile version