Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर रोकडे गावाच्या “त्या’ रस्त्याचा प्रश्न मार्गी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील रोकडे तांडा येथील १ कि.मी रस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे गावकऱ्यांना भेडसावत होता. अशातच आता आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून सदर  रस्त्याच्या त्रासापासून नागरिकांची सुटका होणार आहे.

तालुक्यातील नागदरोड, रोकडे फाटा ते रोकडे तांडा या दरम्यानच्या १ कि.मी. रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागायचा. सदर रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. परंतु आमदार मंगेश दादा चव्हाण यांना सदर गंभीर स्वरूपाची बाब कळताच त्यांनी आश्वासन दिले. आणि आज अखेर त्यांच्या विशेष प्रयत्नातून सदर रस्ता तयार होणार आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ८५ लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला असून सरपंच अनिता सुनिल पवार यांच्या हस्ते आज सकाळी सदर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

दरम्यान प्रत्यक्षात रस्त्याच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाल्याने रोकडे ग्रामस्थांच्या वतीने आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे आभार मानण्यात येत आहे.

तत्पूर्वी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी शब्द दिला आहे की, सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गावात विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. आणि या सोहळ्याला आमदार मंगेश दादा चव्हाण हे गावात येणार असल्याचे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी कळविले आहे. तसेच आमदार मंगेश दादांनी रोकडे तांडा गावांच्या हद्दीत कॉंक्रीटीकरण काम समाविष्ट केले आहे. तसेच गावातील छोटी मोरी, नाले वरील मोरी, संरक्षण भिंतीचे बांधकाम देखील करण्यात येणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनिल पवार, संजय जाधव, संजय पवार,भगवान जाधव, धारासिंग जाधव, प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्या हिरोबाई जाधव, सुनिता पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version