Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर शिवाजीनगर येथील बोहरा मस्जिद जवळील ‘त्या’ गटारीच्या दुरुस्तीस सुरुवात

WhatsApp Image 2019 08 17 at 11.40.08 AM

जळगाव, प्रतिनिधी |  येथील शिवाजी नगर मधील बोहरा मस्जिद जवळ एका अपार्टमेंट चे सांडपाणी वाहून नेणारा पाईप मागील ८ दिवसांपासून फुटला होता. अखेर आज दुरूस्तीचे काम सुरु झाले आहे.

 

शिवाजी नगरातील बोहरा मस्जिद जवळील मकरा अपार्टमेंटचे सांडपाणी वाहून नेणारी गटार ७-८ दिवसापूर्वी फुटली होती. यामुळे गटारीतील घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या परिसरातील नागरिकांनी अपार्टमेंटमधील नागरिकांना वारंवार सांगूनही त्यांनी ती गटार दुरुस्त न केल्याने काल शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन याचा जाब विचारला असता हे काम महापालिकेचे असल्याचा पवित्रा अपार्टमेंट मधील रहिवाशांनी घेतला. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तर अपार्टमेंट मधील रहिवाश्यांनी दुसऱ्याच दिवसी म्हणजे आज शनिवारी १७ ऑगस्ट रोजी सिमेंटचा पाईप आणून तो बसवून या वादावर पडदा टाकला.

Exit mobile version