Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर केंद्र सरकारने भारत बॉन्ड ईटीएफ केले सुरू

nirmala sitaraman

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘भारत बॉंड ईटीएफ’ला सुरू करण्यास आज (दि.4) मंजुरी दिली आहे. या कर्ज फंडामध्ये गुंतवणूक करणा-यांना सरकारकडून संपूर्ण हमी मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या निर्णयाची माहिती दिली आणि सांगितले की, लोक कमीतकमी तीन वर्षे आणि जास्तीत जास्त दहा वर्षे यामध्ये गुंतवणूक करु शकतात.

मागील दोन वर्षांपासून मतमतांतरे असल्याने भारत बॉंडचे लॉन्चिंग रखडले होते. आज अखेर केंद्र सरकारकडून भारत बॉंड ईटीएफची घोषणा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी भारत बॉंड ईटीएफ योजनेची माहिती दिली. भारत बॉंडचे व्यवस्थापन एडलवाईज असेट मॅनेजमेंट या कंपनीकडून केले जाणार आहे. केंद्र सरकारचा हा पहिलाच कॉर्पोरेट बॉंड असून ज्यातून मिळणारा निधी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी आणि इतर सरकारी उपक्रमांसाठी वापरता येईल, असे सितारामन यांनी सांगितले. भारत बॉंडमधून मोठा निधी मिळेल, अशी अपेक्षा सरकारने व्यक्ती केली आहे. यापूर्वी दोन सरकारी ईटीएफ योजनांमधून सरकारने मोठा निधी मिळवला होता. भारत बॉंड ईटीएफच्या तीन वर्षे मुदतीच्या योजनेची मुदतपूर्ती २०२३ मध्ये होईल. २०३० मध्ये १० वर्षांच्या ईटीएफची मुदतपूर्ती होईल. देशातील कॉर्पोरेट बॉंड मार्केटला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारत बॉंडमधून किरकोळ गुंतवणूकदार बॉंड मार्केटकडे वळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version