Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

mantralay building

मुंबई, वृत्तसंस्था | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेर आपल्या मंत्रिमंडळातील सहा सदस्यांना खातेवाटप केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात सरकार स्थापन होवून आज खाते वाटपानंतर ते कामाला सुरुवात करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांनी आपल्याकडे कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग ठेवले आहेत.
एकनाथ संभाजी शिंदे यांच्याकडे गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.
छगन चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.
सुभाष राजाराम देसाई यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.
जयंत राजाराम पाटील यांच्याकडे वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

डॉ. नितीन काशिनाथ राऊत सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण. अशी खाती देण्यात आली आहेत.

Exit mobile version