Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर वीज कर्मचार्‍यांना बोनस जाहीर

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील वीज कर्मचार्‍यांना बोनस जाहीर करण्यात आला असून उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे.

वीज कर्मचार्‍यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. यात अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस म्हणून मिळाले होते. तसेच ते यावर्षीही मिळणार आहेत. यासोबत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या ३६८ अभियंत्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले आहेत.

लॉकडाउन काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात उर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन उर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केली असल्याचं नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, बोनससह अन्य मागण्यांसाठी विविध वीज कर्मचारी संघटांना अतिशय आक्रमक पवित्रा घेतला होता. यातील बोनसची मागणी मान्य करण्यात आल्यामुळे वीज कर्मचार्‍यांचा आजचा संप होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version