Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार आहेत. यात लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी उमदेवारी अर्ज भरण्यास २० मार्च बुधवार रोजी आजपासून सुरूवात झाली आहे, तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २७ मार्च आहे. देशातील १०२ जागेंसाठी पहिल्या टप्प्यात २१ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील राज्यात अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगाणा, उत्तराखंड यांचा समावेश आहे. येथे एकूण १०२ मतदारसंघ आहे. या राज्यांमध्ये पहिल्या आणि एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील विदर्भातील काही मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर यांचा समावेश आहे.

Exit mobile version