फोटोग्राफरला दामदाटी करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी । कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो घेण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफरला दमदाटी करणाऱ्या व्यापाऱ्याविरूध्द बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने राज्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषीत केला आहे. यात जीवनाश्यक वस्तू सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. या अनुषंगाने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या छायाचित्रकारास व्यापाऱ्यांनी दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. 

सकाळी ७ ते ११ वाजेच्या दरम्यान दुकानाच्या समोर रस्त्यावर माल विक्री करण्याच्या बहाण्याने चोरट्या मार्गाने ग्राहकांना दुकानाच्या आत प्रवेश करीत बाहेरून दुकानाचे शटर लावण्याचा प्रकार मुख्य आठवडे बाजार मधील छबीलदास चौधरी व्यापारी संकुलनात सुरू असून आदेशांचे उल्लंघन करीत असल्याचे छायाचित्रण पत्रकार हबीब अहमद सरदार चव्हाण हे सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास टिपत असतांना जनता मॅचिंग सेंटर मधून काही महिला खरेदी करून बाहेर जाण्याचे छायाचित्र टिपताना दुकान मालक व त्याचे दोन अनोळखी इसम सकाळी १०.३० च्या सुमारास कॅमेराच्या दिशेने अंगावर आले व छायाचित्रकार यांना शिवीगाळ केली व तुम्ही परत अस काही जर केले तर तुम्हाला पाहून घेईल असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकाराबाबत हबीब चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अनोळखी इसमाविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content