Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तांबापूऱ्यात अल्पवयीन मुलाला लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवून टाकतो या कारणावरून तांबापूरा येथी टिपू सुलतान चौकात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला एकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शाहदाब गफ्फार माणियार (वय-१६) रा. टिपू सुलतान चौक तांबापुरा हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शहादाब मणियार याला इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून टाकण्याची सवय होती. याचा वाईट वाटल्याने समीर हनिफ काकर याने शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहादाब माणियार याच्या घरासमोर येवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. शाहदाब हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत शहादाब माणियार याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी समीर हनीफ काकर याच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अल्ताफ पठाण करीत आहे.

Exit mobile version