Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवजात बाळाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – हरिभाऊ पाटील

पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील ग्रामीण रुग्णालयात दि. १० मे रोजी एक महिला डीलव्हेरीसाठी आली असून महिलेची प्रसुती झाल्यानंतर जन्म झालेल्या नवजात बाळाचा एका परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी कुठलीही दखल न घेता परिचारिकेस पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. या बाबत बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ पातळी पर्यंत कागदपत्रे तयार करून तक्रार केली होती.

याप्रकरणी कुठलीच दखल घेतली जात नसल्याने तसेच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी केली जात असते. तरीही वैद्यकीय अधिकारी हे “आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातयं” अशी भूमिका कायम असून पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील नवजात बाळाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणी केली असून या मागणीसाठी दि. १३ जून २०२२ रोजी आमरण उपोषणास बसणार आहेत.

Exit mobile version