Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्ता बंद करून गटारीची नासधूर करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; गटनेता अतुल पाटील यांचे निवेदन

यावल प्रतिनिधी । शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील माधव नगरात लेआऊट धारकाने मुख्य रस्ता बंद करून गटारींची नासधूस करून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी गटनेते अतुल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देवून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  यावल नगरपालिकेच्या हद्दीतील माधव नगर भागातील मुख्यरस्ता गेल्या ३०ते ३५ वर्षापासून विरार नगर, गणेश नगर, एकरा नगर, रजा नगर भागातील नागरिक नगर रचना विभागाच्या मंजूर नकाशा प्रमाणे नागरीक वहीवाटीने वापरत आहे. मात्र मागील आठवड्यात अचानकपणे लेआउट धारकाने रस्त्यावर लोखंडी अँगल गाडून रस्ता अडवणूक करून रस्ता बंद केला आहे.  तसेच रस्त्याला लागून नगरपरिषदेने बांधलेली कटार तोडफोड करून मातीने भराव करून बंद करून टाकली आहे. रस्ता बंद केल्याने नागरिकांना फेऱ्याने ये-येणे जाणे करावी लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक रस्ता बंद करून टाकल्याने नागरिकांमध्ये नगरपरिषदे बद्दल प्रचंड नाराजी व रोष व्यक्त होत आहे. हा रस्ता पूर्ववत सुरू करून रस्ता अडवणाऱ्या व गटारीची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई करणे बाबत यावल येथील गटनेते व नगरसेवक अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांना निवेदन दिले आहे..

लेआउट धारक यांनी केलेले अतिक्रमण आठ दिवसात न काढल्यास व रस्ता पूर्व सुरू न केल्यास या क्षेत्रातील रहिवासी नागरिकांसह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पाटील यांनी मुख्याधिकारी अविनाश गांगाडे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Exit mobile version